विश्व हिंदू परिषद सिंहगड भागाच्या वतीने, समरसता भाऊबीज हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
या उपक्रमाद्वारे समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या भगिनींना फराळ बनवण्याचे साहित्य, पणत्या, आकाश कंदील, सुगंधी उटणे आदी पारंपरिक वस्तू भाऊबीजेची ओवाळणी म्हणून देणार आहेत.
खरे तर दिवाळी म्हणजे हिंदूंचा सर्वात मोठा सण, या अश्या सणाला घरात फराळ बनवणे, पहाटे उठून अभ्यंग स्नान करणे आणि मंगलमय वातावरणात गृहलक्ष्मीने कष्टाने बनवलेल्या गोड तिखट फराळाचा एकत्रितपणे आस्वाद घेणे या सारखे समाधान दुसरे नाही.
पण गेल्या १७-१८ महिन्याच्या कठीण काळामुळे, हॅन्ड टू माऊथ अशी परिस्थिती असणाऱ्या अनेकांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले आहे.
जिथे आज मिळाले तर उद्या मिळेल का नाही याचीच भ्रांत होती किंवा काही प्रमाणात आजही आहे तिथे कुठला सण आणि कुठले समाधान.
जेंव्हा कधी आपल्या कुटुंबातील सदस्यांवर संकट येते तेंव्हा आपण बाहेरच्या कोणाची वाट पाहतो का ? नाही ना ?
कोटी कोटी हिंदू बंधू भगिनींच्या या कुटुंबातील विवंचना सोडवण्यासाठी कोणाची वाट का बघावी ? आपणच आपल्या बंधू भगिनींना सहकार्य केले पाहिजे.
" यस्य नारियस्य पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवता " असे मनुस्मृतीत सांगितले आहे, त्यामुळे कधी सरस्वती, कधी अंबिका तर कधी दुर्गेच्या स्वरूपात आपण ज्या आपल्या माता भगिनींना पाहतो त्या भगिनींना भाऊबीज म्हणून काही ओवाळणी आपण देणार का नाही ?
विश्व हिंदू परिषद, सिंहगड भाग, नेहमीच " न हिंदू पतितो भवेत " या उक्तीस अनुसरून संकटात असणाऱ्या हिंदू बंधू-भगिनींना समाजाच्या सहभागातून सहकार्य करत असते.
एका भाऊबीज किटची किंमत रु. ८००/- इतकी असून खालील खात्यावर पैसे पाठवून आपली सेवा आजच संपन्न करा.
Acc Name : Vishva Hindu Parishad sinhgad Bhag
Bank Name : Janata Sah Bank, Hingane Br
Acc NO : 037220100026214
IFSC : JSBP0000037
खालील क्रमंकावर गुगल पे देखील करू शकता.
Google Pay No : 9881833633
Name : Raju Kudale
हा उपक्रम म्हणजे, " तुम्ही आम्ही सकल हिंदू, बंधू बंधू " या सावरकर वचनाची प्रचिती देणारा उपक्रम आहे असेच मला वाटते.
तथापि आपणही अश्याच एखाद्या अनामिक भगिनीला ओवाळणी देण्यासाठी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन आम्ही करत आहोत.
रक्कम जमा केल्यावर पावतीची मागणी अवश्य करा. आपण पाठवलेल्या रकमेची अधिकृत पावती देण्यात येईल.
संपर्क : श्रीपाद श्रीकांत रामदासी [ +९१९६१९४९०५३४ ]
-- माहिती-रंजन समूह पुणे.
टिप : सदर आवाहन हे केवळ प्रचारसेवा या भूमिकेतून करण्यात येत आहे. सदर आर्थिक व्यवहाराशी माहिती-रंजन समूह यांचा काहीही संबंध नाही.