एकाच दिवशी, एकाच वेळी ११ ठिकाणी रक्तदान शिबीर
भारतीय सैन्यातील हुतात्मा जवान आणि हुतात्मा कारसेवक कोठारी बंधू यांच्या स्मरणार्थ विश्व हिंदू परिषद सिंहगड भाग; भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करीत असते, या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते.
आपल्या शहराची रक्ताची गरज भागविण्यात हातभार लागावा, तसेच शक्य तितक्या गरजू रुग्णांचे प्राण वाचावेत यां करीताच हा रक्तदान रुपी सेवायज्ञ चेतवला जातो, म्हणूनच या उपक्रमाला "रक्तदान महायज्ञ" असे नाव देण्यात आले आहे.
या उपक्रमाची दखल घेत, पुणे शहरातील रक्तदान क्षेत्रात महत्वाची कामगिरी करणाऱ्या संस्था असा सन्मान, नाते रक्ताचे ट्रस्टच्या वतीने करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे गुरुवर्य अतुलशास्त्री भगरे यांनी देखील या उपक्रमाचे, जाहीर कौतुक केले आहे.
या महायज्ञाचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे, हा उपक्रम राबवण्याकरता कोणतेही राजकीय पक्ष किंवा नेते, सामाजिक संस्था यांचे कडून रोख स्वरूपात, निधी घेतला जात नाही.
या महायज्ञाचा सर्व खर्च संघटनेचे स्थानिक पदाधिकारी, हितचिंतक आणि कार्यकर्ते स्वयंप्रेरणेने स्वतःच करत असतात.
त्याचप्रमाणे रक्तदात्यांना कोणत्याही प्रकारच्या गिफ्टचे आमिष दाखवले जात नाही, आणि म्हणूनच या उपक्रमामधे १०० हुन अधिक गणेश मंडळे, सेवा भावी संस्था, प्रतिष्ठाने, फाउंडेशन्स देखील सक्रिय पणे सहभागी होतात.
तथापि ज्यांना कोणाला सहकार्य करायचे असेल ते व्यवस्था स्वरूपात करू शकतात.
या उपक्रमाची प्रचार प्रसिद्धी, रक्तदान विषय उपदेशपर स्फुट लेख, काव्ये, व्हिडीओद्वारे, सोशल मीडियातुन केली जाते.
प्रतिवर्षी विविध केंद्रांमधून केंद्रांमधून, विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, पोलीस अधिकारी, आमदार, खासदार, डॉक्टर, वकील, आय टी प्रोफेशनल्स यांसारखे विविध क्षेत्रातील मान्यवरांसह हजारो नागरिक उपस्थितीत रहातात.
एका रक्ताच्या बाटलीतून किंवा पिशवीतून तीन रुग्णांचे प्राण वाचवता येतात, त्यामुळे आजपर्यंत या उपक्रमाद्वारे, सुमारे १५००० रुग्णांचे प्राण वाचवण्यात आले आहेत. हा समाजउपयोगी उपक्रम राबवणारे आयोजक हे समाजशील तरुणाई आहेत, आणि म्हणूनच सामाजिक बांधिलकी जपू पाहणाऱ्या प्रत्येक नागरिकाने या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन आयोजकांना उत्तेजन देणे गरजेचे आहे असे आम्हांस वाटते म्हणूनच हा लेखन प्रपंच.
यंदाच्या वर्षी, रवि. ०५ डिसेंबर २०२१ रोजी, एकाच दिवशी, एकाच वेळी ११ ठिकाणी रक्तदान महायज्ञ संपन्न होणार आहे.
रक्तदान केंद्रांची माहिती मिळवण्याकरता, येथे क्लिक करावे --> रक्तदान महायज्ञ २०२१ केंद्रांची यादी.
द्वारा : माहिती रंजन समूह पुणे.